Freedom Fighters

  1. Hande Nanaso Govindrao- Otur
  2. Sutar Shankar Bajaba-
  3. Kale Gangadhar Maruti- Rajuri
  4. Shinde Ramchandra Shivram- Junnar
  5. Pawar Vishnu Bahiru- Parunde
  6. Fase N.N. -Junnar
  7. Kothari Popat Devichand- Junnar
  8. Kawade Raghu Ganpat- Ozar
  9. Joshi D.N.- Junnar
  10. Khatri Tukaram Dhondo- Junnar
  11. Khatri Chandrakant Ganpat- Junnar
  12. Waman Dashrat Gunaji -Pimpalwandi
  13. Nipunge Vasudev Aatmaram – Aale
  14. Vavhal Ramrao Vishwanath- Junnar
  15. Dastane Sadashiv Pandurang – Otur
  16. Dumbre S.Y. -Otur
  17. Dumbre Ganpat Genu- Otur
  18. Khot Rajaram Kashiram – Junnar
  19. Vavhal Keshav Pandurang- Junnar
  20. Dhamdhere Annaso Yashwantrao -Udapur

Popular & Respected People

  1. Ashkoji Hande (Actor, Singer & Dancer)

He was born in the village of Umbraj in  Pune  in a family of  Varkari . From childhood he liking for  Bhajan , Bharud, Ovya,  Tamasha  etc. Later, his family moved to Mumbai and Hande grew up in Rangari Badak Chawl in Lalbaug, which had 16 buildings and 10,000 residents. Many cultural activities took place there including dombari khel (street acrobats), bhaloonaach (bear dance), powadas (short performances about patriotic leaders and historical figures), lezim (a drill routine with cymbals), kirtans (songs from religion and mythology) and political speeches. Hande participated in competitions during the Ganapati festival. He saw  Vasudev  (a dervish announcing the arrival of dawn) visiting homes in early morning, people going for khandoba jaagar (staying up through the night in devotion of Lord  Khandoba ) which helped him to learn folk music. In college, as part of the NSS (National Social Service) group, Hande walked over 100 km through the tribal areas of  Vangani  where he learned their music. In school days, he was actively involved in local Ganesh Utsav, Navratri Utsav, Kho-kho and other sports and cultural activities. While in school, he participated in drama competitions through the Chikitsak group. During college days in Ruparel college, he appeared in one-act plays, singing competitions, etc. Hande learned music from kirtankars  Sonopant Dandekar , Nijampurkar Baba to  Shahir Sable , Amar Sheikh and Balakram Worlikar Kalapathak. He formed a musical group ‘’Chaurang’’ on 7 August 1987. Chaurang promoted the heritage of Indian culture and tradition; mainly music and dance. Hande started a medley of  Marathi  folk and film songs through “Mangal gaani dangal gaani”. This show became popular and toured  London  and other locations. He made over 1800 performances. Overall, Chaurang crossed a landmark of 6000 shows and travelled to more than 15 states of India as well as countries including the  UK , the  US ,  Canada ,  Belgium ,  Netherlands  and the  UAE . His narration was unique and everybody was applauded for its innovative and different performing style.
Later, Hande performed nine musical shows – Manik Moti (based on Marathi singer  Manik
Varma ‘s life and music), Ganga Jamuna (based on Marathi music director P Savlaram’s
compositions), Amrut Lata (75 of  Lata Mangeshkar ‘s hand-picked songs),  Madhurbala (biography of the beautiful actress  Madhubala  through her songs), Awaz Ki Duniya (based on Bollywood classic songs), Mangal Gaani Dangal Gaani (a cocktail of Marathi songs), Gaane Suhane (all-time hit Hindi songs), Azaadi 60 (commemorating Indian history and 60 years of its independence) Marathi Baana, a cultural extravaganza of  Maharashtra  that includes  bhajan  to  lavani  and from adivasi dances to  Ganesh aarti. In 2005, Hande introduced Marathi Baana. The first performance was staged at Dinanath Natyagruha in  Vile Parle  on November 1, 2005. The show included farmers’ lives, tribals’ stories, bhakti sangeet (devotional music), tamasha-lavani (folk dance), celebration of festivals, koli dance (popular folk dance by the  Kolis – the fisher folk of Maharastra),  burgunda (common sense passed on orally from one generation to the next), as well as ritual festivities like mangalagaur (games women play), gondhal (folk ritual)
and jogwa (dedicated tribe of devotees – jogta/ jogtin who ask for alms).
He directed Manik Moti with the support of Varma’s daughters,  Bharti Achrekar ,  Vandana Gupte  and  Rani Varma  after her death.  Bhakti Barve  was the announcer and also helped with the research. On Lata Mangeshkar’s 75th birthday, Hande paid tribute to her by showcasing her best 75 songs out of some 5000 through Amrut Lata. Hande formed a show based on  Yashwantrao Chavan ‘s life and achievements named Mee Yashwant. Hande also made a show on  Madhubala ‘s life.
Writer and director
Mangal gaani Dangal gaani, Aawaz ki Duniya, Aazadi 50, Gaane Suhane, Manikmoti, Aapli
awad, Manchahe geet, Swagat 2000, Amrutlata, I Love India, Ganga Jamuna, Anandyatri,
Marathi Bana, Adaranjali, Madhurbala, Suvarna Maharashtra, Me Yashwant, Ateet ki naav par,Atre, atre, sarvatre.
Singer
He appeared in more than 7,500 stage shows He worked as a playback singer in Marathi movies and serials such as Hamaal de Dhamal, Shame to Shame, Janta Janardan, Jeevsakha and Rangberangi. He sang  jingles  in many languages, including Mangalgaani Dangal gaani and Awaaz ki Duniya.
Music director
He directed plays and one-acts, audio cassettes, jingles, programs on Doordarshan. He hosted the Maharashtra state government Chitra-rath on 26 January 1994 republic day parade (topic Mango).
Compering
He was the comper for shows including Mangal gaani, Dangal gaani, Awaaz ki Duniya,  Azaadi 50, Gaane Suhane, Marathi Bana.He was a judge in reality shows: Star Pravah and Nach Baliye.

Reference

https://en.wikipedia.org/wiki/Ashok_Hande

2. Bhaskar Hande (Poet, Painter, Sculptor, Filmmaker, Photographer , Printmaker)

BIOGRAPHY

  • 1957 Born in Umbraj (Tal-Junnar Dist-Pune, State Maharashtra, India)
  • 1974 Came to Bombay as banner painter in film industry
  • 1976-81 Studied at sir J. J. Institute of applied arts Mumbai India
  • obtained G.D.ARTS diploma.in applied art.
  • 1979 Forth prize Maharashtra state competation
  • 1981 Second prize Maharashtra state competation
  • 1982 Went to the Netherlands for post graduation
  • 1982-84 Studied at the Royal Academy of Visual Arts the Hague.NL.
  • Obtained diploma in Monumental Painting and Design.
  • 1985-87 Studied animation and video at the Free Academy of Visual
  • Arts the Hague,NL.
  • 1987 Since than is working as free-lance fine artist
  • in The Nederlands (Holland) and India with his design studio.

BOOKS

  • Encounter/Ontmoeting Forum/GTP Amsterdam,NL English/Nederlands Catalogue and poetry Poet Adriaan Morrian1990
  • DASHAK BAPU Nashik,IND Marathi poetry1995
  • Your form is my creation Vaishwik Pune,IND Marathi/English Artbook/catalogue Text Dilip Chitre /Dr.Sadanand More 1995
  • Budala gaon gaon budala Bapu Nashik,IND Marathi poetry 1996
  • Merging colours Warre fine arts English catalogue Artimediar The Hague,N1996
  • Your form is my creation Century Union The Hague NL Hindi/English artbook/ catalogue1997
  • Holland-India Marathi/Nederlands artbook/catalogue
  • Prints by Bhaskar Hande Century union The Hague,NL English/Nederlands part one 1999
  • BHASKAR1999/2000 Gallery Blackheath London,UK English artbook/catalogue 2001
  • Holland-Europe Vaishwik Pune,IND Give and take in art 2 Marathi / Nederlands artbook/catalogue
  • Tirast Manera Vaishwik Pune, IND Marathi poetry
  • Encounter with International artist Stg. IHK The Hague NL Stg. Internationale Haagse Kunst 2004
  • Amber Amber international,Amsterdam NL International Dutch and Punjabi literature 2005
  • Amber Amber international, Amsterdam NL International Dutch and Punjabi literature 2006
  • Colour Saga Exhibition catalogue Fabs Warsaw Poland 2008
  • Show Your Hope Vaishwik/Artimediair The Hague Holland
  • Drawings of Palakhi Sohala 2008 Vaishwik Pune, India.2009
  • 325 years Dehu- Alandi to Pandharpure Asha di Palkhisohala 19 A Black Substance Artimediair The Hague Holland.2011
  • Kale Tatva Akshar Manav (Marathi) publisher Akshar Manav Pune 2013    
  • Liberal pursuits in Arts and Philosophy English and Dutch 2014
  • Intuitive Knowlagde/ Knowlagde of second Kind English Public foundation Amsterdam NL
  • Vari/ Dehu Palkhisohala. Vaishwik Pune, India

For More Details :

https://bhaskarhande.wixsite.com/bhaskarhande

https://www.youtube.com/@bhaskarhande

3. Rupali Repale

शिवकन्या ते सागरकन्या”* जुन्नरचं क्रिडा वैभव : रूपाली रेपाळे
निर्भेळ ‘यश’ कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही किंवा कोणाच्या आज्ञेने येत नाही. त्यासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करावी लागते. जाणीवपूर्वक खडतर, कष्टप्रद मार्गाने जाण्याचे धाडस केल्याशिवाय यशवंत, किर्तीवंत
होता येत नाही. चिकाटी, मेहनत, जिद्द, आत्मविश्वास, आत्मनिर्धार या यशाच्या गुरूकिल्ल्या आहेत. योग्य वेळी,
योग्य दिशेने स्वत:ला पूर्णपणे समर्पित करून प्रयत्न केले तरच यश निश्चित प्राप्त होईल. ‘प्रयत्न सोडू नकोस,
संकटांना घाबरू नकोस, यश निश्चित आहे, तुला यश मिळालेच पाहिजे, पुढे जात रहा’ असे आपणच आपल्या
मनाला ठणकावून सांगितले पाहिजे. ही प्रेरणादायी जीवन कहाणी आहे जागतिक किर्तीची जलतरणपटू ‘रूपाली
रेपाळे’ यांची. आपल्या जुन्नर तालुक्यातील रूपाली रेपाळे यांनी ‘लांब पल्ल्याचं पोहणं’ (Long distance
Swimming) या क्रिडा प्रकारात अनेक विक्रम, अनेक मापदंड प्रस्थापित केले आहेत, नव्हे नव्हे रूपाली रेपाळे
यांची दैदिप्यमान कामगिरी या क्रिडा प्रकारात मैलाचा दगड ठरली आहे.
जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगावचे रेखा आणि रामदास रेपाळे या सामान्य दाम्पत्यांच्या घरात रूपालीचा ३
फेब्रुवारी १९८२ रोजी जन्म झाला. जेमतेम शिक्षण झालेले रामदास रेपाळे प्रचंड ध्येयवादी आणि जबरदस्त
महत्वाकांक्षी होते. वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईत येऊन पडेल ते काम करत, वेळप्रसंगी हाॅटेलमध्ये काम करून
त्यांनी आपले पाय मुंबई शहरात घट्ट रोवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून
कायमस्वरुपी नोकरी लागली, पत्नी रेखा यांची सुद्धा शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. घाटकोपरला भटवाडी येथे
भाड्याच्या खोलीत छोट्या रूपालीसह हे कुटुंब रहात होतं. परंतु रामदास रेपाळे हे अजब रसायन होतं, नोकरी
करून फारसं काही होणार नाही हे त्यांच्या अल्पावधीतच लक्षात आलं. पत्नी रेखा यांना विश्वासात घेत
स्वत:च्या मालकीची खोली नसतानाही त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि भांडूपला रहायला गेले.
स्वत:चा छोटासा व्यवसाय सुरू केला. एके दिवशी चौथी-पाचवीत असलेल्या रूपालीला घेऊन ते मुलुंड येथील
महानगरपालिकेच्या तरण तलावात दाखल झाले.
कोणत्याही मुलीला वाटते तशी छोट्या रूपालीलाही प्रथम पाण्याची प्रचंड भिती वाटली. जेमतेम आठ दिवस
बरोबर गेल्यानंतर वडील रामदास यांनी, तुला हे करायचंच आहे, तू माझ्या घरात जन्माला आली आहेस, तुला
इतरांपेक्षा वेगळ॔ काहीतरी व्हायचं आहे.’ असं ठणकावून सांगितले. बालपणात रमण्याचे, आईला बिलगून
झोपण्याचे ते सुंदर दिवस होते, पण रूपालीला मात्र एकटीला सकाळी सहा वाजता वडिलांनी नेमलेल्या
रिक्षावाल्यासोबत जावे लागे. तरणतलावात जाऊन पोहणं हा तसा महागडा आणि सामान्यांना न परवडणारा
प्रकार होता. थोडे दिवस रोज सकाळी रडारड, टाळाटाळ, तरण तलावाचे ठिकाणी लपून बसणे असे अयशस्वी
प्रयत्न रूपालीने करून पाहिले. परंतु लवकरच वडिलांचा निर्णय, इच्छा आणि स्वप्न रूपालीने स्विकारले. भिती

जाऊन आवड निर्माण झाली. पाण्याबरोबर मैत्री झाली, तासन् तास रूपाली पाण्याबाहेर येत नसे. इथेच एका
रोमहर्षक, चित्तथरारक आणि प्रेरणादायी कारकिर्दीला प्रारंभ झाला. एका महान जलतरणपटूचा उदय झाला.
एके दिवशी ध्यानीमनी नसताना तेथील प्रशिक्षकांनी वडिल रामदास यांना धरमतर – गेटवे बद्दल सुचवलं.
वडिलांनी मनात घेतले की रूपालीने कधीही प्रतिप्रश्न केला नाही. सकाळी मुलुंड तर दुपारी शहाजी राजे
तरणतलाव, अंधेरी असा रोजचा चार तास प्रवास व आठ तास सराव सुरू झाला. एवढ्या लहान मुलीला
एकटीला भर समुद्रात सोडणे याला लोकांनी वेडेपणा म्हटलं होतं. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया अंतर ३८
नाॅटिकल किलोमीटर रूपालीने वयाच्या केवळ आकराव्या वर्षी प्रथम प्रयत्नात पूर्ण केले. यासाठी लागणारा सर्व
खर्च रूपालीच्या वडिलांनी केला. यानंतर मात्र जगात जे सहा मोठे channel आहेत ते रूपालीने लहान वयातच
पार करावेत अशी वडिलांची इच्छा होती. Channel म्हणजे दोन भिन्न देशांच्या दोन भिन्न किना-यांमधील
विस्तीर्ण असा सागरी प्रदेश. बारा वर्षे वयाची आणि बेचाळीस किलो वजनाची अट पूर्ण होताच world
swimming association कडून English channel पार करण्याची परवानगी मिळवण्यात आली. या
association चे काही संकेत असतात ते पाळावे लागतात, अन्यथा कोणत्याही क्षणी ते swimmer ला अपात्र
ठरवू शकतात.
English channel पार करण्यासाठी प्रवास, रहाणे, जेवण-खाण हा सर्व दहा दिवसांचा खर्च अंदाजे दोन ते तीन
लाख रूपये होता. कोणीही sponsor नव्हता, रूपालीच्या आईने gold loan केले होते. त्यावेळीही हे सर्व
कशासाठी? काय मिळणार आहे? एवढ्याशा मुलीवर इतका खर्च ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ते
बरोबरही होते कारण long distance swimming ला फारशी लोकप्रियता नव्हती, पैसे किंवा नाव मिळणे तर
दूरच. या channel मध्ये तिन्ही ॠतु एकाच वेळी अनुभवायला मिळतात आणि तेही अगदी तीव्रत्तम! खरंतर एक
महिना अगोदर तेथे जाऊन सराव करणे, हवामानशी जुळवून घेणे आवश्यक होते. पण पैशांअभावी फक्त दहा
दिवसांचेच नियोजन करण्यात आले. आपण जर अपात्र ठरलो तर दुसरी संधी कदाचित आपल्याला कधीही
मिळणार नाही ही जाणिव ठेवूनच इवल्याशा रूपालीने English channel मध्ये झेप घेतली. समुद्रात सतत
बदलणारी परिस्थिती, भरती-ओहोटी, पाण्याचे तापमान, स्वत:चे तापमान सांभाळायचे आव्हान असते. दर एक
तासाने observer boat वरून एका दोरीला बांधून एक चाॅकलेटचा तुकडा व ग्लुकोज पाण्याची बाटली फेकली
जायची. केवळ वीस सेक॔दात कशाचाही आधार न घेता ते घ्यायचे आणि swimming करायचे. इंग्लंड ते फ्रान्स
किनारा हे अंतर १६ तास ७ मिनिटांत पूर्ण करणारी रूपाली दुसरी सर्वात लहान मुलगी आणि आशियातील
सर्वात तरूण जलतरणपटू ठरली.
यानंतर नंबर लागला तो जिब्राल्टर channel म्हणजे मोरोक्को ते स्पेन अंतर २८ नाॅटिकल किलोमीटर. दोन्ही
देशांच्या naval अधिका-यांच्या उपस्थितीत वयाच्या १२ वर्षी रूपालीने केवळ सात तासात पूर्ण केले. यानंतर
धरमतर double म्हणजेच गेटवे – धरमतर – गेटवे. हे लांब पल्ल्याचं अंतर तेराव्या वर्षी रूपालीने सतत २४ तास
पोहून पूर्ण केले. विषारी सापांची भिती व तामिळ वाघांच्या हल्ल्याची शक्यता असलेली श्रीलंकन पाल्क
सामुद्रधुनी रूपालीने कडेकोट बंदोबस्तात ११ तासात पार केली. ही खाडी पार करणारी ती पहिली महिला
बनली. यानंतर ऑस्ट्रेलियातील शार्क बाधित Philip’s Bay म्हणून ओळख असलेले अंतर ७५ नाॅटिकल
किलोमीटरचे पार करण्याचा अतिशय थरारक, कठोर, साहसी व वेदनादायी अनुभव. शार्कमुळे इथे धातूचा
पिंजरा बनवून त्यात swimmer पोहणार व pilot बोटीतील लोकांनी पिंजरा पुढे ओढायचा असा प्रकार असतो.
अनेकदा रूपालीचा आणि पिंजरा ओढणारांचा टायमिंग miss match व्हायचा आणि रूपालीचे पाय मागील
बाजूस आदळायचे किंवा पुढील बाजूस हात पिंज-यावर जोरजोराने आदळायचे. यामुळे हाता पायांना अनेक
जखमा झाल्या, नखंही गेली, त्यात खारे पाणी, पण रूपाली मागे हटली नाही. तिने चौदाव्या वर्षी ही खाडी पार
केली.
आता New zealand च्या south व north island दरम्यान असलेली खाडी म्हणजे cook strait चा नंबर होता.
एकुण अंतर २८ नाॅटिकल किलोमीटर. रूपालीसाठी फक्त सहा तास पुरेसे होते. परंतु अचानक वा-यांचा वेग

प्रचंड वाढला आणि ही खाडी पार करायला रूपालीला वीस तास लागले. मध्यंतरी वडिलांनीही तीला, ‘तू सोडून
दे’ अशी विनंती केली पण त्यांना नकार देत ती यशस्वी झाली. द. आफ्रिकेतील Robin island ची खाडी
वर्णभेदामुळे पोहण्यासाठी काळ्या swimmer ला बंदी होती. परंतु रूपालीचे आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड पाहून
तीला परवानगी मिळवण्यात यश आले आणि तिथेही ती पहिली महिला ठरली. पोहून समुद्र संपले…जगातील
प्रसिद्ध सात खाड्या पहिल्याच प्रयत्नात पार करणारी रूपाली पहिली तरूण महिला ठरली. आठराव्या वर्षानंतर
रूपालीने ट्रायथलाॅन इव्हेंट आणि सायकलिंगमध्येही स्वत:ला सिद्ध केले. अनेक आशियायी स्पर्धांमध्ये सहभाग
आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने पदके मिळवली.
स्वकर्तृत्वाने रूपाली यांनी long distance swimming या क्रिडा प्रकाराला एक वेगळी ओळख दिली. आजपर्यंत
अनेक सन्मान रूपाली यांना प्राप्त झाले. तत्कालीन राष्ट्रपती मा. शंकर दयाळ शर्मा यांचे शुभहस्ते १९९५ साली
‘राष्ट्रीय युवा पुरस्कार.’ तर ‘राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ क्रिडामंत्री उमाभारती यांचे शुभहस्ते १९९९ साली
मिळाले. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डाॅ. पी. सी. अलेक्झांडर यांचेकडून १९९५ साली ‘हिमा फाऊंडेशन
पुरस्कार’ मिळाला. महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार’ तर दिलाच पण ‘सागरकन्या’ ही
पदवी देऊन गौरविले. न्यूझीलंड सरकारने ‘डाॅल्फिन क्वीन’ या किताबाने सन्मानित केले. आपल्या यशात
भांडूपची ब्राइट हायस्कूल आणि वझे केळकर काॅलेजचा त्या आवर्जून उल्लेख करतात. याच दरम्यान सावरगाव
येथील हिंगे परिवाराची सून म्हणून रूपाली यांचा गृहप्रवेश झाला. परंतु वडिल रामदास रेपाळे यांच्याशी
असलेले त्यांचे नाते एका वेगळ्या उंचीवर आजही पहायला मिळते. पिता आणि कन्या एवढेच भावनात्मक नाते
राहत नाही. वडिल म्हणजे मित्र, मार्गदर्शक, आदर्श असा जाज्वल्य अभिमान पदोपदी रूपाली यांच्या
बोलण्यातून व्यक्त होतो. आजही त्या वडिलांबरोबर जलशुध्दीकरण उपकरण बनविणा-या ‘रूपाली इंडस्ट्रीज’
मध्ये संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. पती, दोन मुले असा परिवार असूनही ‘रूपाली अकादमी’तून
राष्ट्रीय स्तरावरील swimmer तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. सुमेध वडावाला लिखीत
आणि राजहंस प्रकाशन यांनी ‘जल आक्रमिले’ हे रूपाली रेपाळे यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. तरुणांना
पोहण्याला प्रोत्साहीत करण्यासाठी या पुस्तकातील एक उतारा राज्य शासनाने शालेय अभ्यासक्रमात सामील
केला होता.
मी विचारलेल्या एका प्रश्नावर रूपालीताईंनी, ‘मला जर संधी मिळाली तर जुन्नर तालुक्यातील मुला – मुलींना
मी नक्की प्रशिक्षण देईल. माझा तसा मनोदयही आहे. यासाठी कोणीतरी सुनियोजित असा उपक्रम राबविण्याची
गरज आहे असं अतिशय उत्साहाने सांगितले. एवढी मोठी जागतिक किर्तीची जलतरणपटू पण दिड तासाच्या
प्रदिर्घ चर्चेत कुठेही अहंकाराचा लवलेश नाही. आजही आपल्या मातीची ओढ असलेली, अक्षय्यतृतीयेला
नियमितपणे यात्रेला येणारी, आपल्या सर्वगुणसंपन्न जुन्नर तालुक्याबद्दल मनमोकळेपणाने भरभरून बोलणारी,
‘शिवकन्या ते सागरकन्या’ असा संपूर्ण तालुक्याला भूषणावह जीवन प्रवास असलेली सौ. रूपाली रेपाळे – हिंगे
या ख-या अर्थाने जुन्नर तालुक्याचे ‘क्रिडा वैभव’ आहेत…पंचवीस वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्याचे नाव जगाच्या
कानाकोप-यात पोहचवणारी एक आंतरराष्ट्रीय महिला जलतरणपटू अजून ‘शिवनेर भूषण’ पुरस्कारापासून दूर
आहे, याची मात्र मनाला फार मोठी खंत वाटते.
विशेष सूचना ~ कृपया ही पोस्ट पुढे शेअर करताना मूळ लेखकाच्या नावासह शेअर करावी.
~ लेखन ~
श्री. संजय वसंतराव नलावडे
धोलवड, मुंबई मोबाइल – ८४५१९८०९०२

निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजनांची

3.भारताचे प्रथम वनसंरक्षक :- Dr Alexander Gibson

Alexander Gibson (1800–1867) was a  Scottish   surgeon  and  botanist  who worked in  India . He was born in  Kincardineshire  and studied at  Edinburgh . He went to India as a surgeon in
the  Honourable East India Company . He became a superintendent of the Dapuri botanical
gardens (1838-47) under the erstwhile  Bombay Presidency .He was appointed as the first
Conservator of Forests of India on March 22, 1847.He published several works on botany and
reports on forestry in India. He laid a foundation stone of Indian forestry and made a memorable contribution.
Early life
Alexander was born on October 24, 1800, in Lorensk, Scotland. As a child, Alexander learned
from his father religious tolerance, love of nature, and progressive farming skills. He studied
Latin, Greek, and natural history at the Mauritius College in Monterrey, Montreux Academy. In 1825, the East India Company sent Dr. Appointed Gibson as ‘Flag Surgeon’. Gibson was
awarded the Ava Medal in Burma for his outstanding service. In 1827, Dr. Gibson came to
Matunga in Mumbai from Burma after being appointed as an ‘Assistant Surgeon’ for the Troops of Bombay Horse, Artillery. In 1830, he was appointed for vaccination work in Gujarat, Konkan and Deccan. He could speak Marathi, Hindi, Gujarati. Dr. Gibson interacted with the Bhils and other tribal communities on the cultivation of moha. He built a ‘Botanical Garden’ in village
Hiware in Junnar taluka of Pune district of India. He provided free medical services to the
villagers . He introduced new agricultural crops to local farmers here by experimenting on crops like sago, potato, sugarcane. The medical service in India during the late 19th century widely quoted the works of  Alexander Humboldt  linking  deforestation , increasing aridity, and temperature change on a global scale. [1]  Several reports which spoke of large-scale deforestation and desiccation were coming up, prominent among them being the medico-topographical reports by  Ranald Martin , a surgeon. In another report, Gibson wrote to Sir  Joseph Dalton Hooker  in 1841 that “the Deccan is more bare than Gujarat” with the ghat mountain trees disappearing
fast. [2]  He requested Hooker to influence the government to control the forests in
the  Deccan  and  Konkan  region. This led to the creation of the Bombay forest conservancy and Gibson was made conservator of forests. This was the first case of state management of forests in the world. [3]  He has written two valuable books on Indian flora they are Bombay Flora in 1861 na Handbook to the Forests of the Bombay Presidency in 1863.
Service to Forest[ edit ]
Due to shortage of timber supply to the East India Company for shipbuilding, in 1840, the
Government of Mumbai ordered a survey of the northern forests of the Western Ghats. Given to Gibson. Dr. Gibson conducted the survey on horseback from 1840 to 1844. To avoid the dangers of malaria and toxic gases, Gibson would get up at three in the morning and walk eight miles in the light of a flashlight. Four miles on horseback and four miles from eight o’clock in the morning. He traveled 800 miles for 100 days and traveled from Mumbai to South Karnataka. At that time, a large amount of deforestation and barren and barren lands. Gibson was found. Coal, agricultural implements, wheels, civil works, poles, ammunition trucks, guns, fuel, etc. The vast forest was destroyed for things. In 1842, he recorded that “the locals are ready to cut down trees but are not aware of the importance of planting trees.” Regarding handing over the responsibility of the forest to the people, Dr. Gibson advised the government to reconsider and stressed the need to create rules to curb illegal logging. Extra pruning of trees gave people wood. The foundation of social forestry was laid through public participation and partnership. Gibson first underlined the need for proper management of forests. [4]  In 1836, the Governor of Mumbai, Sir Robert Grant appointed Dr. Gibson at Dapodi Udyan which was situated on 90 acres along the river Pawana. Gibson emphasized the quality of medicinal plants and crops there. Gibson hired an anonymous Portuguese painter for 26 months at a salary of 20 rupees a month for making sketches of flowering plants in the vicinity of Dapodi and Hiware Garden . Gibson himself took pains to make paintings of 173 plants. These paintings are known as ‘Dapodi Drawings’. These
original paintings are still preserved in Edinburgh. The agricultural implements Gibson sent to Scotland 177 years ago included local spades, shovels, seed drills, plows, and threshing
machines. The bullock cart sent from Junnar is housed in the National Museum of Scotland. [5]  He was instrumental in the implementation of forest conservation laws under the East India Company, and he was able to systematically propagandise a forest conservation program with help from  Hugh Francis Cleghorn  and  Edward Balfour . Dr. Gibson wrote over 48 research papers on traditional medicinal plants. His writings were published in the research journal ‘Journal of the Agricultural and Horticultural Society of India’.
Memorial at Junnar[ edit ]
A memorial was erected by his wife on the back water of Kukadi River dam. Nearby are also the stone tombs of Gibson’s three pet dogs, Lazy, Hector and Tipu. Near the memorial is Gibson’s bungalow, where Gibson used to write ‘Forest’ and ‘Garden Report’ in the dim light of a lantern on a stormy rainy night, and the stable for horses on which he rode eight miles a day are still in good condition. The rare mahogany tree planted by Gibson two hundred years ago still stands out. The existence of a small dam built by Stokes can be seen here.
Gibson left for Scotland in 1864. Gibson breathed his last on January 16, 1867, at Scotland,
during a blizzard. The standard  author abbreviation  A.Gibson is used to indicate this person as the author when  citing  a  botanical name .

Information available on YouTube

 https://youtu.be/9DYkqCl_GBw
 https://www.youtube.com/watch?v=LEUvqjcyJhw
 https://www.youtube.com/watch?v=gtAc1hDGog8
 https://www.youtube.com/watch?v=4k-zZOOigLA

4.Vithabai Narayangavkar

पोटासाठी नाचते मी.. पर्वा कुणाची”* तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर
ह्रदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या आणि शरीराच्या अनेक तक्रारींमुळे त्रस्त असल्याने हाॅस्पिटलमध्ये भरती
झालेल्या एका ज्येष्ठ कलावंतीणीला तमाशा कलेवरील अपार प्रेम आणि निष्ठा यातून निर्माण झालेली तमाशा
कलेची आणि बोर्डाची ओढ स्वस्थ बसू देईना. तमाशा कलेच्या माध्यमातून गावच्या कुलदैवताची सेवा
करण्याचा वाडवडिलांपासूनचा रिवाज खंडित होऊ नये म्हणून ही पिडीत कलावंतीण डाॅक्टरांना विनवणी करत
होती. फक्त तीस टक्के क्षमतेने ह्रदयाचे काम चालणारी ही पेशंट कलावंतीण डाॅक्टरांनी हाॅस्पिटलच्या नव्हे तर
रूमच्याही बाहेर पडण्यास परवानगी नाकारल्याने व्यथित अंतःकरणाने अश्रू ढाळीत, ‘साहेब… असं करू नका,
फक्त एकच गाणं म्हणते अन् परत येते… हवं तर तुम्ही बरोबर चला’ अशी हात जोडून विनंती करीत होती.
नाईलाज झालेले डाॅक्टर बोर्डाच्या बाजूला उभे राहून पायात चाळ बांधलेल्या या वृद्ध कलावंतीणीचे बेधुंद नृत्य
पाहून अवाक् झाले होते. तमाशा पंढरी नारायणगाव येथे मुक्ताबाई यात्रेत २००० साली घडलेल्या या
प्रसंगातील बोर्डाच्या बाजूला उभे असलेले होते विघ्नहर हाॅस्पिटलचे डॉ. सदानंद राऊत आणि बोर्डावर नाचणारी
कलावंतीण होती राष्ट्रपती पदक विजेती ‘विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर.’ महाराष्ट्रातील तमाशा रसिकांनी
‘तमाशासम्राज्ञी’ बिरूदावली देऊन गौरविलेली ‘विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर’ म्हणजे कलेवर अपार
श्रद्धा आणि निष्ठा असलेली तमाशा रसिकांची लाडकी ‘विठा’ होय.
सन १९३५ च्या जुलै महिन्यात पंढरपूरला आषाढी यात्रेच्या दिवशी शाहीर पठ्ठे बापूरावांचा शिष्य शाहीर ‘भाऊ

  • बापू मांग नारायणगावकर’ यांचा त्याकाळातील प्रचंड गाजलेल्या तमाशाचा खेळ तुफान गर्दीत सुरू होता.
    राॅकेलच्या ढणढणलेल्या टेंभ्यांच्या उजेडात गण, गवळण, बतावणी संपून ‘संत गोरा कुंभार’ हे गाजलेलं वगनाट्य
    ऐन रंगात आले होते. शाहीर भाऊ मांग साकारत असलेल्या संत गोरोबांनी चिखलात तुडवलेल्या मुलाला

त्याच्या आक्रोश करणाऱ्या मातेने हाक मारताच ते मूल ‘आई’ म्हणत धावत आले आणि त्याचवेळी राहूटीत
भाऊची बायको शांताबाईने एका गोड मुलीला जन्म दिला. पंढरीच्या विठ्ठलाच्या कृपाछायेमुळेच शांता सुखाने
मोकळी होऊन पोरगी पदरात पडली म्हणून भाऊने पोरीचे नाव ‘विठाबाई’ ठेवले. भाऊ आणि शांता यांचं
चौदावं अपत्य असलेल्या विठाबाईला भाऊ लाडाने ‘चौदावं रत्न’ म्हणायचा. विठाचं बालपण तमाशा फडाच्या
भटकंतीत नकळत घडत होते. पाच वर्षांच्या विठाला भाऊने नारायणगावच्या शाळेत घातले खरे पण विठा
गवळण, लावणी आणि कविता यातच रमलेली दिसायची. कधी कधी आपल्या इवल्याशा पायात चाळ बांधून
विठा बोर्डावर ठेका धरून फिरक्या घेताना दिसू लागली. दररोज फडातील कलाकारांना पाहून अनेक गोष्टी
विठाच्या अंगी उतरल्या होत्या.
भाऊ – बापू मांग नारायणगावकर तमाशा फड मुंबईत आला की नाटककार मामा वरेरकर एकातरी खेळाला
आवर्जून हजेरी लावत असत. छोट्या विठाच्या अभिनयाची लकब, गाण्यातला सूर, नृत्यातील अदा आणि
सौंदर्याची झलक मामा वरेरकरांच्या नजरेतून सुटली नाही. आठ वर्षांच्या विठावर कलेचे अधिक संस्कार घडावेत
या हेतूने मामा वरेरकरांनी भाऊच्या परवानगीने विठा आणि तिची मोठी बहीण केशर यांना आपल्या
कलापथकात दाखल करून घेतले. विठा आणि केशरला मामा वरेरकरांच्या कलापथकातून अनेकदा परप्रांतात
जाण्याची संधी मिळाली. अनेक दिग्गजांचा सहवास लाभल्याने दिवसागणिक कलेच्या विविध अंगाची जाण
प्रगल्भ होत जाऊन विठा विविध कलागुणांनी संपन्न, समृद्ध होत गेली. हिवाळा सुरू झाला तसा भाऊ – बापूचा
फडही घराबाहेर पडला आणि एके दिवशी कराड तालुक्यातील कोळेगाव ग्रामदैवताच्या यात्रेत तमाशा
रसिकांच्या खच्चून गर्दीसमोर भाऊ – बापू फडाचा सामना भाऊ अकलेकरच्या फडाशी पडला. सवाल जबाबाची
जुगलबंदी उत्तरोत्तर रंगत गेली पण भाऊ – बापूकडे स्त्री नृत्यांगना नसल्याने भाऊ अकलेकरची जवान मुलगी
शालनसमोर भाऊ – बापू मांग नारायणगावकर तमाशा फडाला हार पत्करावी लागली.
आजपर्यंत कधीही हार न पाहिलेल्या भाऊला या पराभवाने वर्मी घाव बसल्यासारखे झाले अन् पहाटेच उठून
भाऊने तडक मुंबई गाठली. रात्री घडलेला सारा प्रसंग भाऊने विठाच्या पुढ्यात मामा वरेरकरांना कथन
करताच, तेरा वर्षाच्या विठाच्या मस्तकात तिडीक उठली अन् ती ताडकन् उभी राहिली. भाऊचं लाडकं शेंडेफळ
असलेली विठा निर्धाराने बापाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भाऊबरोबर कराड येथे कोळेगावला दिवे
लागणीला हजर झाली. रात्री शालनचा तमाशा सुरू झाला तशी साजशृंगार करून पायात चाळ बांधलेली विठा
पहिल्यांदा पायऱ्या चढून बोर्डावर उभी राहिली. मामा वरेरकरांच्या देखरेखीखाली अभिनय, गायन, नृत्य निपुण
झालेल्या विठाने बोर्डावरून शालनला डिवचले आणि ‘हिम्मत असेल तर माझ्याशी सामना कर’ असे आव्हान
दिले. आदल्या रात्रीच्या विजयाची धुंदी डोळ्यांवर असलेल्या शालनला तेरा वर्षाच्या कोवळ्या विठाच्या
आव्हानात फारसा दम वाटला नाही आणि सामना सुरू झाला. रात्र सरत चालली तशी शालन – विठाची
जुगलबंदी रंगत गेली. सुरवातीला शालनच्या बोर्डापुढे जमलेली रसिकांची गर्दी विठाच्या अदाकारीने बेहोश
होऊन कधी विठाच्या बोर्डासमोर येऊन बसली ते गर्दीलाही कळले नाही. विठाच्या बोर्डापुढील गर्दी पाहून
अवसान गळालेल्या शालनला विठाने ठेवणीतला सवाल टाकला… ‘पुरूष समागम थेंबापोटी, नार होतसे गरवार
गं… परि नराश्रूंच्या थेंबापोटी, नार कोण ती गरवार गं गं..?’ विठाच्या या सवालाने निरूत्तर झालेल्या शालनने
हार स्विकारली. पहिल्यांदाच बोर्डावर उभी राहिलेल्या कोवळ्या विठाने चोवीस तासांच्या आत बापाच्या
पराभवाचा हिशोब चुकता केला होता. भाऊच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले कारण ‘विठाबाई भाऊ मांग
नारायणगावकर’ नावाच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला होता.
कराडचा सामना जिंकल्याने भाऊ – बापू मांग नारायणगावकर तमाशा फडाची लोकप्रियता शिगेला गेली होती.
विठाचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम
महाराष्ट्र आणि मुंबईसह महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधून भाऊ – बापू खुडे मांग नारायणगावकर तमाशा फडाची
घोडदौड सुरू होती. विठाच्या आवाजातील गवळणी, लावणी, मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी आणि
नृत्यातील अदाकारी, वगनाट्यातील अभिनय पाहण्यासाठी रसिक पंधरा वीस किलोमीटर अंतर चालत यायचे.

मुंबई, पुणेसारख्या शहरात भाऊ बापूचा तमाशा आला की खास विठाचे गाणे, नृत्य आणि अदाकारी पाहून
दौलतजादा करण्यासाठी बड्या बड्या असामी येऊ लागल्या. भाऊ बापूचा तमाशा म्हणजे विठा असे समीकरण
झाले होते. आठ नऊ वर्षांचा कालावधी दौरे, प्रवास, जागरण यामुळे प्रचंड धावपळीचा पण भरभराटीचा गेला.
एके दिवशी भाऊला अर्धांगवायूचा झटका येऊन एक बाजू निकामी झाली आणि काही दिवसांतच भाऊचे निधन
झाले. विठाबाईची किर्ती आणि नावलौकिक सर्वदूर पसरली होती तरी फड भाऊ – बापू मांग नारायणगावकर या
नावानेच सुरू होता आणि फडाची सर्व धुरा बापूच सांभाळीत होता. यादरम्यान १९६१ साली संगीत नाटक
अकादमी समितीच्या काही ज्येष्ठ मराठी मंडळींनी या फडाचा नामांकन अर्ज भरून घेतला आणि या फडाला
प्रयोग सादर करण्यासाठी थेट दिल्लीचे निमंत्रण दिले.
दिल्लीतील सर्वभाषिक रसिकांनी तुडुंब भरलेल्या एका विशाल कलादालनात प्रयोग होत असलेल्या मंचासमोर
पहिल्या रांगेत भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद बसले होते. गण, गवळण, बतावणी, रंगबाजी संपली अन्
साजशृंगार केलेली ऐन पंचवीशीतील विठाबाई विजेच्या वेगाने मंचावर अवतरली. ढोलकी, तुणतुणे आणि
घुंगराच्या एकत्रित तालावर ठेका धरत विठाबाई मंत्रमुग्ध होऊन नाचत असतानाच राष्ट्रपतींकडे पहात आणि
हातवारे करत गळ्यातून प्रसिद्ध लावणी गाऊ लगली, ‘ह्यो ह्यो पाव्हणा बरा दिसतो गं बाई बरा दिसतो, ह्यो
टोपीवाला पाव्हणा बरा दिसतो गं बाई, ह्यो मिशावाला पाव्हणा बरा दिसतो… बरा दिसतो गं गं बाई बरा
दिसतो.’ विठाबाईची ही अदा पाहून आणि थेट राष्ट्रपतींकडेच उंगलीनिर्देश केल्याने कलादालनातील सर्वच
मराठी मंडळी अचंबित झाली पण राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मात्र स्मितहास्य करून विठाला दाद दिली.
काही दिवसांनी संगीत नाटक अकादमीचा ‘राष्ट्रपती पुरस्कार’ भाऊ बापूच्या तमाशाला जाहीर झाला.
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेल्यावर बापूने फडाचा प्राण असलेल्या विठाबाईला
पुरस्कार घ्यायला सांगितले. परंतु विठाबाई बापूला म्हणाली, ‘एवढा मोठा मान माझ्या नशिबात असेल तर
मलाही कधी ना कधी मिळेल, हा तुझा मान आहे, हा देखणा सोहळा पहायला तात्या पाहिजे होता’ आणि
दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. भाऊ बापू मांग नारायणगावकर हा तमाशा फड संगीत नाटक अकादमीचा
‘राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त करणारा पहिला तमाशा फड ठरला.
सन १९६२ मध्ये सारा देश गाढ झोपेत असताना चिनने भारताच्या नेफा प्रदेशात फौजा घुसवल्या आणि
युद्धाला तोंड फुटले. अचानक झालेल्या आक्रमणाने बेसावध भारतीय सैनिकांची पिछेहाट होऊन युद्ध लांबल्याने
पं. नेहरूंनी संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना जबाबदारी दिली. खचलेल्या भारतीय सैनिकांचे
मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि मनोरंजनातून युद्धाचा ताण हलका करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार
नेफा प्रदेशाच्या सीमेवर विठाबाईच्या होकारानंतर पंधरा दिवसांच्या विशेष दौऱ्याच्या आखणीत दहा बारा
खेळांचे आयोजन करण्यात आले. यासाठी विठाबाई आणि कलाकारांनी खास मराठी हिंदी भाषेतून कार्यक्रमाचे
सादरीकरण आणि मराठी हिंदी गाण्यांबरोबर देशभक्तीपर गीतांची तयारी केली होती. चिनी सैनिक बाॅम्बचा
वर्षाव करत असताना मरणाची तसूभरही भिती न बाळगता विठाबाई आणि कलाकारांनी देशासाठी प्राणपणाने
लढणाऱ्या जवानांची सेवा करुन राष्ट्रकार्याचा आदर्श भारतीयांसमोर ठेवला. एका लष्करी गाडीतून विठाबाई
आपल्या कलाकारांसह परतीच्या प्रवासाला निघाली तेंव्हा निरोप देण्यासाठी भारतीय सैन्यातील मोठमोठे
अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती पुरस्कार आणि नेफा सीमेवरील पराक्रम यामुळे भाऊ बापू मांग
नारायणगावकर तमाशा फडाची नव्या उत्साहाने आणि नव्या जोमाने महाराष्ट्रभर घोडदौड सुरू होती.
सावळकांती सौंदर्य, नृत्यातील अदा, गायनातील सूर आणि अभिनयातील कसदारपणा यामुळे विठाबाई तमाशा
रसिकांच्या ह्रदय सिंहासनावर ‘तमाशाची राणी’ म्हणून आरूढ झाली होती. परंतु भाऊबरोबर तमाशा फडाची
उभारणी करणारा आणि विठावर पित्यासमान प्रेम करणाऱ्या बापूने मात्र या जगाचा कायमचा निरोप घेतला
होता. बापूच्या निधनानंतर त्याच महिन्यात सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरला महादेवाच्या यात्रेत भाऊ
बापूचा तमाशा तुफान गर्दीत सुरू होता. गण, गवळण संपून बतावणी सुरू झाली आणि नऊ महिन्यांच्या गरोदर
विठाबाईने, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ ही बहारदार लावणी अशी काही सादर केली की रसिक बेहोश

होऊन गेले. रंगबाजी संपून ‘रायगडाची राणी’ हे ऐतिहासिक वगनाट्य चढत्या रात्री बरोबर रंगू लागले तसे
सोयराबाईचे काम करणाऱ्या विठाबाईला जोरदार प्रसुती वेदना सुरू झाल्याने ती बोर्डामागे गेली. रसिकांची
करमणूक करण्यासाठी दोन नृत्यांगना बोर्डावर येऊन नाचगाणी सादर करू लागल्या. रंगात आलेले वगनाट्य बंद
करून अर्धातास उलटून गेल्यावर नाचगाण्याला कंटाळलेल्या रसिकांनी गोंधळ सुरू केला. राहुटीत एका
म्हातारीने विठाला मोकळं करून धारदार दगडाने नाळ ठेचून बाळाला वेगळं केलं आणि प्रचंड थकव्याने आडवी
झालेल्या विठाच्या कुशीत दिले होते. रसिकांचा गलका वाढत जाऊन ‘वगनाट्य सुरू करा, विठाला बोलवा,
आम्ही विठाला पहायला आलोय’ हा गोंगाट विठाच्या कानापर्यंत पोहचला अन् ती ताडकन् उठली. आपलं
ओटीपोट एका कपड्याने घट्ट आवळून बांधत विठाबाई पुन्हा तयार होऊन बोर्डावर हजर झाली. रसिकांच्या
टाळ्या शिट्यांच्या आवाजात ढोलकीच्या तालावर विठाने एक ठसकेबाज लावणी पेश केल्यावर रसिकांना
नमस्कार करून घडला प्रकार कथन केला आणि त्यांच्या परवानगीनेच ती बोर्डाच्या मागे गेली.
याच दरम्यान १९६८ साली पुणे येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय तमाशा परिषद’ स्वागताध्यक्षपदी विठाबाई
नारायणगावकर यांची निवड झाली. बापूच्या निधनानंतर दोन अडीच वर्षे फड जोशात सुरू होता परंतु कुटुंब
कलह विकोपाला गेला होता. अखेर १९७० मध्ये विठाबाईने स्वतंत्र फड काढण्याचा निर्णय घेतला आणि कै.
भाऊ – बापू मांग नारायणगावकर संचालित ‘विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ या नवीन
फडाचा उदय झाला. पुण्याच्या चतुशृंगी देवीच्या जत्रेत विठाबाईने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रक्तात
न्हाली कुऱ्हाड’ या नव्या वगनाट्यासह पहिला प्रयोग सादर केला. विठाबाई नावाच्या जादूने रसिकांनी,
ठेकेदारांनी हा फड डोक्यावर घेतला, वर्तमानपत्रांतून विठाबाई आणि तिच्या कला प्रेमाविषयी रकानेच्या रकाने
भरून येत होते. विठाबाईची लोकप्रियता लक्षात घेऊन कवी रामदास फुटाणे यांनी ‘सर्वसाक्षी’ चित्रपटासाठी
विठाबाईवर एक बैठकीची लावणी चित्रीत केली. या अगोदरही विठाबाईने छोटा जवान, उमज पडेल तर,
कलगी तुला, सांगत्ये एका, भाऊबीज या सिनेमात काम केले होते. सन १९८१ साली डिझेलची अभूतपूर्व टंचाई
निर्माण झाल्याने तमाशा फडांच्या गाड्या पाच पाच – सहा सहा दिवस एकाच जागेवर उभ्या राहत होत्या. अशा
परिस्थितीत मुंबईत असलेले प्रमुख फडमालक आणि ठेकेदार यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर
अंतुले यांना वर्षा बंगल्यावर जाऊन एक निवेदन दिले. थोड्याशा गप्पानंतर मंडळी उठली तसे विठाबाईने पुढे
होऊन मुख्यमंत्री महोदयांना रात्री रंगभवनला खेळ पहायला यायचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण
स्वीकारले तसे विठाबाईने बाईसाहेबांनाही घेऊन या असं म्हणत थेट आतल्या खोलीत जाऊन बाईसाहेबांनाच
निमंत्रण दिले.
शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय रात्री सपत्नीक रंगभवनला उपस्थित राहिले, दोन अडीच तास तमाशा
पाहिला, विठाबाईंचा सत्कार केला आणि डिझेलची टंचाई संपेपर्यंत प्रत्येक फडमालकाला १५० लिटर डिझेल
सरकारी किंमतीने देण्यात येईल अशी घोषणा करून निघून गेले. विठाबाईचा करिश्मा सर्वांनाच भुरळ घालत
होता पण फडातलं वातावरण मात्र फारसं अलबेल नव्हतं. कर्जात चाललेल्या फडावर आणखी एक संकट
कोसळले, कात्रजजवळ विठाबाईच्या फडाच्या लक्झरी बसला अपघात झाला. जिवितहानी झाली नसली तरी
अनेक कलावंत जखमी झाले होते. रिपेरींगला टाकलेली बस पैशांअभावी अडकून पडली होती. सांगलीच्या
सावकाराकडे ट्रक आणि तंबू गहाण पडला होता. तंबू, कणात, राहुटीशिवाय कलाकारांना घेऊन एसटीने प्रवास
करण्याची वेळ विठाबाईवर आली होती. मुंबईत झेवियरच्या मैदानात उघड्यावर ‘तमाशाची राणी’ विठाबाई
खिन्न मनाने रहात होती. लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी विठाबाईची दैन्यावस्था निवेदक प्रदिप
भिडे यांच्या कानावर घातली. दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये नाट्यावलोकन सदरात विठाबाईच्या दूरावस्थेवर
प्रदिप भिडेंचा एक लेख प्रसिद्ध झालाच पण या उभयतांनी विठाबाईचा विषय संपादक माधव गडकरी यांच्याही
कानावर घातला. माधव गडकरींनी चौफेर सदरात ‘राष्ट्रपती पुरस्कार विजेती विठाबाई आज वाऱ्यावर’ हा लेख
१२ सप्टेंबर १९८६ रोजी छापला आणि चमत्कार झाला. देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून
तर विठाबाईवर प्रेम करणाऱ्या खेड्यापाड्यातील रसिकांपर्यंत सर्वांनीच मदतीचं हात पुढे केला. मुंबईतील

एशियाटिक इमारतीच्या टाऊन हॉलमध्ये मोहन धारिया यांच्या शुभहस्ते विठाबाईचा सत्कार करण्यात आला
आणि सावकाराकडून सोडवलेला ट्रक, तंबू आणि गॅरेजमधून आणलेली लक्झरी विठाबाईच्या स्वाधीन करण्यात
आली.
परंतु तरीसुद्धा थकलेल्या विठाबाईचा तमाशा फड कर्जाच्या विळख्यातून पूर्णपणे कधीच मुक्त होऊ शकला नाही
आणि अखेर १९९० साली ‘विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड बंद करण्यात आला.
काही दिवसांतच विठाबाईला संगीत नाटक अकादमीचा नामांकन अर्ज भरण्याचे पत्र आले आणि अर्ज
भरल्यानंतर पंधरा दिवसांतच दुसऱ्या पत्राद्वारे संगीत नाटक अकादमीचे विठाबाईला संचासह प्रयोग सादर
करण्यासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण आले. यथावकाश विठाबाईने दिल्लीकरांना पुन्हा जिंकले आणि
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळाला ‘संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार’ जाहीर
झाला. दिनांक १८ एप्रिल १९९० रोजी संध्याकाळी फिरोजशहा रोडवरील ‘रविंद्र भवन’ येथील मंचावर
भारताचे महामहिम राष्ट्रपती आर. व्यकंटरामण त्यांची पत्नी सौ. जानकी देवी आणि अकादमी अध्यक्ष गिरीश
कर्नाड स्थानापन्न झाले होते. तमाशा कला क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विठाबाई भाऊ मांग
नारायणगावकर हे नाव पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाहीर झाले आणि विठाबाईला सन्मानपूर्वक मंचावर
नेण्यात आले. विठाबाईंना देण्यासाठी राष्ट्रपतींनी पुरस्कार हातात घेतला तोच विठाबाई म्हणाली, ‘जरा थांबा
साहेब, मेमसाब और आप मिलकर यह पुरस्कार मुझे दिजिए, क्योंकि आप इतने बडे पदपर पहुॅंचे है उसके पीछे
उनका मी बडा योगदान है!’ क्षणभर स्तब्ध झालेल्या महामहिम राष्ट्रपतींनी जानकीदेवींकडे पाहिले,
भारावलेल्या जानकी देवी राष्ट्रपतींशेजारी येऊन उभ्या राहिल्या. दोघांच्या हस्ते विठाबाईंनी पुरस्कार
स्वीकारताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, परंतु विठाबाईच्या डोळ्यात मात्र एकोणतीस वर्षांपूर्वी
झालेल्या पुरस्कार सोहळ्याच्या आठवणींनी पाणी तरळले होते.
यानंतर महाराष्ट्र शासनाने विठाबाईला १९९० सालचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर केला. हात पाय
थकलेली विठाबाई दिवसेंदिवस तुटत चालली होती.. पोटासाठी नाचते मी..पर्वा कुणाची ?हेच अंतिम सत्य उरलं
होतं, आयुष्याचा मेळ बसला नव्हता. दिनांक १६ ऑक्टोबर १९९८ रोजी विठाबाईला ह्रदयविकाराचा तीव्र
झटका आला. विघ्नहर हाॅस्पिटलचे डॉ. सदानंद राऊत आणि पत्नी डॉ. पल्लवी राऊत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा
केली आणि तीन दिवसांनंतर विठाबाई शुद्धीवर आली. जुन्नर तालुक्याची शान आणि वैभव असलेल्या
विठाबाईचा जुन्नरकरांनी मानपत्र देऊन एका मोठ्या सोहळ्यात गौरव केला. एका बाजूला विठाबाईवर
पुरस्कारांची खैरात होत होती तर दुसरीकडे दिवसागणिक विठाबाईची तब्येत ढासळत चालली होती. अखेर १३
जानेवारी २००२ रोजी विठाबाईला जोरदार अर्धांगवायूचा झटका येऊन मेंदूतील शीर तुटून रक्तस्त्राव होऊ
लागला. डॉ. राऊतांच्या सल्ल्यानुसार विठाबाईंना पुणे येथे हलविण्यात आले परंतु यश आले नाही. दिनांक १५
जानेवारी २००२ रोजी पहाटे विठाबाईने तमाशा रसिकांचा अखेरचा निरोप घेतला. काही कालावधीनंतर
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हा फड विठाबाईची मुलं राजेश, कैलास आणि कुटुंबियांनी पुनरूज्जीवीत
केला आणि आजतागायत अखंडपणे तमाशा कलेचा वारसा जपला आहे.
~ लेखक ~
श्री. संजय वसंतराव नलावडे धोलवड, मुंबई

मोबाइल – ८४५१९८०९०२